गोगलगायींवर उपचार
साधारणता: पावसाळ्यात किंवा जिथे जमीनीत सतत ओल असेल तीथे गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो. यांचे बरेच प्रकार आहेत , पण सर्वांपासून पिकांना त्रास होतो. याचा बंदोबस्त बर्याच प्रकारांनी करता येतो , पण आपण केवळ सेंद्रिय पद्धतीचा वापर करणार आहोत .
| SNAILS & SLUGS |
*उपचार*
शकतो गोगलगायी संध्याकाळी - रात्री बाहेर पडतात.
१) गोगलगायी हाताने पकडून बादलीत गोळा कराव्यात. २) फाटलेले गोणपाट - बारदाण एकरी १५ - २० नग पाण्यात भिजवून पिका मधल्या मोकळ्या जागेत जमीनीवर पसरून ठेवावेत. गोगलगायी त्यांच्या खाली जमा होतात , सकाळी वेचून बादलीत गोळा कराव्यात. ३) ओल्या , सुक्या गवताचे लहान लहान ढिग मोकळ्या जमीनीवर जमा करावेत व त्यावर पाणी शिंपडून ओले करावेत. सकाळी गवत हटवल्यावर त्याखाली बर्याच गोगलगायी मिळतील , वेचून बादलीत गोळा कराव्यात. ४) अंड्यांच्या टरफलांचा चुरा करून झाडांच्या बुंध्याशी पसरावा. गोगलगायीचे कवच टणक असले तरी खालून त्यांचं अंग फार मऊ व नाजूक असते , अंड्यांच्या टरफलांच्या तुकड्यां वरून चालताना त्यांना खोलवर जखमा होऊन त्या मरतात. ५) तंबाखूची बारीक भुकटी कपड्यात बांधून धुरळणी करावी. ( तंबाखूची भुकटी आपल्या शरीराला आपयकारक असल्याने याचा वापर टाळावा ) ६) ३% व्हिनेगर ( अॅपल सिडार )ची फवारणी जमीनीवर केल्यास त्या मरतात. ७) तसेच एप्सम साॅल्टची (रासायनिक आहे ) धुरळणी केल्यास त्या मरतात . ८) २ किलो लसूण मिक्सरमधून चांगला वाटून त्यात २ किलो काॅफी पावडर शंभर लिटर पाण्यात दिवसभर भिजवून वस्त्रगाळ करून संध्याकाळी जमीनीवर , झाडांवर फवारणी करावी , दर दोन दिवसांनी फवारणी चारदा केल्यास परत गोगलगायी येत नाहीत. 9)सर्वोत्तम उपाय म्हणजे: अ) एक बादलीत गुळाचे पाणी तयार ठेवावे, ब) जमीनीवर एकरी १५-२० ठिकाणी अंड्यांच्या टरफलांचा चुरा ठेवावा त्यावर थोडे ओल्या गवताचा ढिग ठेवून त्यावर व त्याच्या आसपास गुळाचे पाणी शिंपडावे , वर ओले बारदाण /पोते झाकावे . सकाळी मोठ्या प्रमाणावर गोगलगायी सापडतात त्यात बर्याच खरचटू मेलेल्या असतात . सर्व गोळा करून बादलीत भराव्यात. या बादल्या पाण्याने भरून त्यात पाव किलो साबणाची पावडर मिसळावी , काही वेळातच त्या मरतात. या व्यतिरीक्त सापळे लावून त्यात बिअर , यीस्ट पावडर + साखरेचे द्रावण देखील वापरले जाते.
| SNAILS & SLUGS |
गोगलगायींवर उपचार
0 टिप्पण्या