वाफसा म्हणजे काय ?
कृषिविध्यापिठे खोटे बोलतात की , " मुळयाना पाणी पाहिजे " . पण नैसर्गिक सत्य हे आहे की , कोणत्याही झाडाच्या मुळीला पाणी नको . झाड पाणी पीत नाही . किंबहुना मुळी पाण्याला स्पर्शही करत नाही . मुळयाना पाणी नको तर वाफसा हवा . आपण बीजाम्रुत संस्कार केला , जीवाम्रुत देऊन आच्छादन केले पण मुळीजवळ
वाफसा नसेल तर पिकाचि वाढ होणार नाही . ही चारही तत्वे ( बीजाम्रुत , जीवाम्रुत , आच्छादन व वाफसा ) एकमेकाशी इतके जुळलेले आहेत की यापैकी एकाला ही टाळता येणार नाही . " This is complete package of practices " ही चारही तत्वे अंमलात आनाविच लागतील . उदा . 1) गादी वाफ्यात कांदे किंवा लसुण लावतो . वाफ्याच्या काटाचे कांदे मोठे होतात कारण तेथे वाफसा असतो . 2) उंच सखल भाग - त्यात तूर पेरली - सखल भागातील तूर खुरटी व उंच भागातील तूर जोमदार दिसेल कारण वाफसा .
![]() |
| वाफसा |
समजा जमिनीत अंगभुत उष्णता आहे जेणेकरुन त्या उष्णतेणे प्रति मिनट 2 ली पाण्याची वाफ होते तेव्हा 2 ली पाणी दिले तर वाफसा होईल . पण जर आपण 2 ली ऐवजी 4 ली पाणी दिले तर 2 ली पाण्याची वाफ बनेल व 2 ली पाणी तसेच राहील व वाफसा राहणार नाही . म्हणून जमिनीला एवढेच पाणी दिले पाहिजे जेणेकरून मुळीजवळ वाफसा राहील व अतिरिक्त पाणी गांडूळनि पाडलेल्या छिद्रातुन भूजल साठ्याकडे निघुन जाईल व वाफसा कायम राहील * जमिनीत वाफसा कसा निर्माण करावा ? कोणत्याही झाडांची दुपारी 12 वा . ज्या ठिकाणी सावली पडते त्या सावलीच्या कडेला (सीमेवर ) अन्न व वाफसा घेणारी मुळी असते . वाफसा व अन्न घेणारी मुळी सावलीच्या आतमध्ये अजिबात नसते . आपण जर सीमेवर पाणी दिले म्हणजेच मुळीच्या तोंडात पाणी ओतले तर तर अशावेळी वाफसा किती घ्यावा हे मुळीने ठरवले नाही तर आपण ठरविले .
खरेतर वाफसा किती घ्यावा हे ठरविण्याचा अधिकार मुळीचा आहे , आपला नाही म्हणूनच मुळयाचा तोंडात त्यांच्या मनाविरुद्ध ओततो म्हणुन वाफसा निर्माण होत नाही . तेव्हा सावलीच्या बाहेर / सीमेपासुन 6" बाहेर ड्रीपर टाकुन व निचरासाठी नाली काढुन दिली तर मुळी त्या पान्यापर्यन्त जाईल व पाहिजे तेवढा वाफसा निर्माण होईल .सीमेच्या आतमध्ये जर पावसाचे पाणी किंवा सिंचनाचे पाणी भरले तर मुळयाजवळ पोकळया पाण्याने भरतात व मुळया सडतात , झाडांची सड़ होते , झाड पिवळे पडते . ( उदा . मोसन्बिच्या झाडावर डींक = खोडातून स्त्रव वाहने ) म्हणुन सावलीच्या आतमध्ये पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी जमा होऊ देऊ नये . ते पाणी ताबडतोब बाहेर काढुन देण्याची व्यवस्था करावी . हे अतिरिक्त पाणी काढून देण्यासाठी झाडाच्या खोडापासुन झाडाच्या सीमेपर्यन्त उतारता थर देऊन पाणी काढुन दिले पाहिजे जेणेकरून पाणी निघुन जाईल मुळ सड़ होणार नाही .सावलीच्या आतील पाणी काढुनदिले तरी अतिरिक्त ओलावा असतोच असतो . तो काढुन देण्यासाठी वाफसा निर्माण करण्यासाठी सीमेपासून 6" वर नाली काढतो तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्तीने जास्त दाबाकडूण कमी दाबाकडे म्हणजे मुळयापासून नालीत आपोआप उतरतो व मुळीजवळ वाफसा सतत रहातो .

0 टिप्पण्या