तणनाशके फवारताना हि काळजी घ्यावी
![]() |
| तणनाशके फवारताना हि काळजी घ्यावी. |
1) विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशकेच दिलेल्या मात्रेत व दिलेल्या वेळी अचूकपणे वापरावीत. तणनाशकाची मात्रा चुकल्यास म्हणजे तणनाशकाची शिफारशीपेक्षा कमी मात्रा दिल्यास तणांचे नियंत्रण कमी प्रमाणात होते, तर अधिक मात्रा वापरल्यास पिकांना इजा होण्याचा धोका असतो.
2) मुदत संपलेली (Expired) तणनाशके वापरू नयेत. तणनाशके खरेदी करताना याची काळजी घ्यावी.
3) तणनाशकांच्या फवारणीसाठी वेगळा (स्वतंत्र) पाठीवरचा नॅपसॅक पंप किंवा फुटस्प्रे वापरावा; परंतु ते शक्य नसल्यास तणनाशकांच्या फवारणीनंतर त्याच पंपाने पिकावर कीटकनाशके फवारणी करण्यापूर्वी फवारणी पंप दोन-तीन वेळा साबणाच्या पावडरणे स्वच्छ धुऊनच वापरावा.
4) तणनाशके ही नेहमी जोराचे वारे नसताना तसेच स्वच्छ सूर्यप्रकाशात फवारावीत. तसेच फवारणीनंतर तीन ते चार तास पाऊस न येण्याची शक्यता पाहूनच फवारणी करावी. ढगाळ वातावरणात फवारणी करणे टाळावे.
5) फवारा जमिनीवर मारताना फवारा मारणाऱ्याने मागे-मागे सरकत जावे, जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जमिनीवर पावले पडणार नाहीत.
6) तणनाशके फवारलेले शेत तुडवू नये. कमीत कमी 12-15 दिवस कोणतीही मशागत करू नये.
7) तणनाशकांचा वापर कोणत्याही कीटकनाशक, बुरशीनाशक, वाढनियंत्रक, खते किंवा घुलनशील द्रावकासोबत मिसळून करू नये.
8) तणनाशकाचे शिल्लक राहिलेले द्रावण कोणत्याही पिकाच्या जमिनीत, पाण्याची डबकी किंवा इतर वाहत्या पाण्यात टाकू नये.
9) तणांमध्ये तणनाशकांसाठी निर्माण होणारा प्रतिकार किंवा त्यांच्यात होणारे बदल टाळण्यासाठी तणनाशकांचा क्रमवार, आलटून-पालटून तसेच इतर पद्धतींच्या जोडीने त्यांचा वापर करावा.
10) तणनियंत्रणासाठी परिस्थितीनुसारच तणनाशकांचा शिफारशीनुसार वापर करावा. त्यांच्या वारंवार वापराचा अतिरेक टाळावा, तसेच तणनाशके फवारलेल्या जमिनीत दर वर्षी शेणखत किंवा कंपोस्ट खत अथवा गांडूळ खताचा वापर करावा.
11) तणनाशकात किटकनाशकाचे मिश्रण करू नये किंवा कमी तिव्रता असलेले व अनुभव माहिती असेल तरच मिश्रण करावे .

0 टिप्पण्या