' ईएम ' (EM) म्हणजे काय?

EFFECTIVE MICRORGANISM

♻️ईएम (EM) म्हणजे इफेक्टिव्ह मायक्रोऑरगॅनिझम्स (Effective Micro-organisms).

♻️ह एक परिणामकारक नैसर्गिक, सजीव जिवाणूंचा समावेश असलेले द्रावण आहे.

♻️सद्रीय शेतीमधील महत्त्वाचा घटक.

♻️या द्रावणांचा शोध १९८० च्या सुमारास डॉ. तेरीयू हिगा यांनी जपान येथे लावला.

♻️या द्रावणांमध्ये एकूण ८० जिवाणूंचा समावेश असला तरी यामध्ये प्रामुख्याने लैक्टिक आम्ल बैक्टेरिया (Lactobacillus sp.), फोटोसिंथेटिक बैक्टेरिया (Rhodopseudomonas sp.) आणि यीस्ट (Saccharomyces sp.) या जिवांणूंचा समावेश असतात 

♻️या द्रावणांचा वापर शेती, कुक्कुटपालन, पशुपालन, घन कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, सेंद्रिय खतनिर्मितीमध्ये फायदेशीर दिसून आला आहे.

♻️ही द्रावण जमिनीमध्ये 'अँटिओक्सिडेंड'चे काम करून पीकवाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात.

♻️जमिनीचा वाढलेला सामू कमी करण्यासाठी या द्रावणाच्या वापर करतात

♻️ही द्रावण आम्लधर्मी असल्यामुळे ठिबक सिंचन संचामध्ये अडकणारे क्षार विरघळून जातात.शेवाळ वाढत नाही.

♻️जिवाणू खतांचा ईएम-२ सोबत केलेला वापर जास्त परिणामकारक दिसून येतो.

♻️जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये चांगल्या पद्धतीचा परिणाम दिसून येतो.

♻️जमिनीतील सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.

♻️सद्रिय घटकांच्या वाढीमुळे पीकांच्या पांढऱ्या मुळ्या वाढतात.

♻️झाडाची अन्नद्रव्य ग्रहणाची शक्ती वाढते.

♻️पिकाची चांगली वाढ होते.

♻️फळांची गुणवत्ता वाढते.

♻️ एक लिटर ईएम-२ द्रावण प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून याचा वापर शेतीसाठी तसेच रोपवाटिकेसाठी करावा.

♻️फळझाडांसाठी आठवड्यातून एकदा ठिबक सिंचनातून एक लिटर ईएम-२ प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून व्हेंचुरीच्या माध्यमातून द्यावे.

♻️रोपवाटिकेमध्ये ईएम-२ चा वापर केल्यामुळे रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते, रोपे तजेलदार होतात.

♻️ईएमचा वापर करताना विद्राव्य खत त्याच वेळी पिकांना देऊ नये.

♻️मोसंबी, संत्रा या पिकाला ईएमचा वापर केल्याने फुले लागण्याचे प्रमाण वाढते, फळधारणा चांगली होते.

♻️ विशेषतः ऊस या पिकाची वाढ चांगली होते. मुळांची वाढ, पेरांची संख्या, फुटव्यांची संख्या, तसेच पेऱ्यातील अंतर वाढते.

♻️कळी पिकाची एकसारखी वाढ होते.

♻️काही शेतकरी चिकू, पेरू, डाळिंब, द्राक्ष या पिकांसाठी वापर करताहेत.

♻️साधारणपणे १०० लिटर पाण्यात एक लिटर ईएम-२ हे द्रावण मिसळून गोठ्यात फवारावे.

ईएम" म्हणजे काय?
EFFECTIVE MICRORGANISM